Advertisement

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

एक आदर्श विद्यार्थी जन्मापासून आदर्श राहत नाही. तो चांगले शिक्षण मिळवून व चांगल्या लोकांसोबत राहून आदर्श बनतो. वर्गातील एक आदर्श विद्यार्थी तो असतो ज्याला पाहून शिक्षक व इतर विद्यार्थी प्रभावित होतात. प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असते की त्याचा वर्ग आदर्श विद्यार्थ्यांनी भरलेला असावा. असे म्हणतात की जर एखादे कार्य आपण पुन्हा पुन्हा करत असू तर शरीराला त्याची सवय होऊन जाते. आदर्श विद्यार्थ्याचे काही गुण पुढील प्रमाणे आहेत, ज्यांना आचरणात आणून सामान्य विद्यार्थीही आदर्श बनू शकतो.


एका आदर्श विद्यार्थ्यांमधील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो मेहनती असतो. तो आपल्या आयुष्यात एक स्वप्न निर्धारित करून ठेवतो. व त्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवतो. आदर्श विद्यार्थी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आपले संपूर्ण बळ लाऊन प्रयत्न करतो. तो खेळ, अभ्यास व इतर सर्व गोष्टी उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. व कधीही प्रयत्न करण्यात संकोच करीत नाही.


आदर्श विद्यार्थ्यांतील दुसरा गुण त्याचा उर्जावानपणा असतो. एक आदर्श विद्यार्थी नेहमी ऊर्जेने भरलेला असतो, तो कधीही आळस करत नाही. तो दररोज सकाळी लवकर उठतो त्याची दिनचर्या ठरलेली असते. तो दररोज योग व व्यायाम करतो. कधीही फास्ट फूड न खाता तो नेहमी आरोग्यदायी भाजीपाला खातो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ऊर्जा राहते व त्यांचे चित्त अभ्यासात लागते. 


जिज्ञासा हे देखील आदर्श विद्यार्थ्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. एका आदर्श विद्यार्थ्याला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी जिज्ञासा लागलेली असते. तो शिक्षकांना नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारीत असतो. वेगवेगळी पुस्तके व माहिती वाचून तो ज्ञान ग्रहण करतो. 


सकारात्मकता हा आदर्श विद्यार्थ्याचा महत्त्वाचं गुण आहे. तो आयुष्य आणि आयुष्यातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. विद्यार्थी तसेच प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी सकारात्मकता अती महत्त्वाची आहे. कारण सकारात्मक दृष्टीकोण सर्वच समस्या सोडवण्यात सहाय्यक आहे. आपल्याला जर आदर्श विद्यार्थी बनायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक समस्येला हसून स्वीकारायला हवे. 


याशिवाय आदर्श विद्यार्थ्याचा आणखी एक महत्त्वाचं गुण म्हणजे तो नेहमी खरे बोलतो व मोठ्यांच्या आज्ञेचे पालन करतो. जो विद्यार्थी खोटे बोलतो त्याला एक खोटे लपण्यासाठी अनेक खोटे बोलावे लागतात. ज्यामुळे त्याला नेहमी खोटे बोलण्याची सवय लागते. आणि नेहमी खोटे बोलणारा व्यक्ती कधीही अशस्वी होत नाही. या शिवाय आदर्श विद्यार्थ्याला आज्ञाकारी राहायला हवे. नेहमी मोठ्यांच्या आज्ञाचे पालन करायला हवे. कारण मोठे लोक नेहमी आपल्या चांगल्यासाठी सल्ला देतात म्हणून त्यांचे ऐकणारे विद्यार्थी नेहमी यश प्राप्त करतात. 


एका आदर्श विद्यार्थी घडवण्यात आई वडील, शिक्षक आणि समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. लहानपणापासून मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना आदर्श बनवले जाऊ शकते. एक आदर्श विद्यार्थी आयुष्यातील सर्व समस्या पार करीत देशाचे व आपल्या समाजाचे नाव मोठे करतो. म्हणून आज आवश्यकता आहे की शाळा तसेच पालक मंडळीनी आपल्या मुलानं कडे योग्य लक्ष देऊन त्यांना आदेश गुणांनी शिक्षित करायला हवे.

--समाप्त--