पोपटाची आत्मकथा | poptache manogat in marathi
मी एक पोपट आहे. माझा रंग हिरवा आणि चोच लाल आहे. लोक म्हणतात की मी खूप सुंदर दिसतो. म्हणून मनुष्याला मी खूप आवडतो. अनेक लोक मला पाळण्याची इच्छा बाळगतात. आपल्या घरात शो म्हणून मला बंदिस्त पिंजऱ्यात लटकवताता. मला खाऊ पिऊ घालतात. व अनेक तऱ्हेचे शिक्षण देतात. लोकांचे मानणे आहे की मी त्यांची हुबेहूब नकल करतो. मी कोणतेही गोष्ट कमी वेळात शिकून जातो. मला माणसांप्रमाणे अनेक शब्द बोलता येतात. मला मिरची खायायला आवडते. परंतु माझ्या प्रजाती मधील इतर पोपट लहान मोठे कीटक देखील खातात.
मला समूहात राहायला आवडते, जेव्हाही मी कोणाच्या घरावर जाऊन बसतो तेव्हा ते लोक मला पकडून पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी मनुष्यापासून नेहमी दूरच राहतो. मला पिंजऱ्यात राहण्यापेक्षा आकाशात उंच सैर करायला आवडते. एकदा असाच माझ्या मित्रांसोबत उडत मी शहराकडे आलो. शहरातील एका उंच इमारतीवर आम्ही सर्व मित्र जाऊन बसलो. तेव्हाच एका व्यक्तीने गुपचूप मागून येऊन मला पकडून घेतले. माझ्या मित्रांना लक्षात येताच ते सर्व उडाले. मी मात्र त्याच्या घट्ट तावडीतून सुटू शकलो नाही. यानंतर त्या व्यक्तीने मला घरात नेऊन एका पिंजऱ्यात टाकले व त्या पिंजर्याचे दार बाहेरून लावून घेतले.
सुरुवातीला मी बाहेर निघण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु सर्व व्यर्थ ठरले. माझ्या पंखांना इजा होऊ लागली. शेवटी थकून मी निपचित पडून राहिलो. मला पकडणारा व्यक्ती त्याच्या आई वडिलांसोबत राहत असे. मला पिंजऱ्यात राहायला आवडत नसे परंतु त्या कुटुंबातील लोक माझी खूप काळजी करत असत. सकाळ-संध्याकाळ मला दूध, पोळी, मिरची इत्यादी माझे आवडते अन्न खायला देत असत. खरे सांगू तर आठवडाभरातच मला पिंजऱ्यातील जीवनाची सवय झाली. मला येथे राहून आनंद वाटू लागला.
बोलता बोलता एक महिना झाला मला माझ्या मित्र व आईची आठवण येऊ लागली. माझी आकाशात उडण्याची देखील भरपूर इच्छा होत होती. घराचे सदस्य रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे लाऊन मला उडायला सोडत असत. घरातील त्या छोट्याशा जागेत मी थोडेफार उडून घ्यायचो. परंतू आकाशात मोकळेपणाने उडण्याची मजाच वेगळी होती. एके दिवशी त्या कुटुंबातील लोकांनी मला असेच मोकळे सोडले. तेवढ्यात घरातील मला पकडणारा तो व्यक्ती दार उघडून आत येऊ लागला. मला उडून जाण्यासाठीची संधी मिळाली होती. एक जोरदार झेप घेऊन मी घराच्या बाहेर निघालो. बाहेर आल्यावर मी आनंदाने नाचू लागलो. मला स्वातंत्र्य मिळाले होते. तुफान वेगाने उडत मी माझ्या मित्रांजवळ पोहोचलो.
त्या कुटुंबातील सर्व लोक चांगले होते, माझी खूप काळजी घेत असत. परंतु माझे खरे जीवन आकाशात उडण्यातच आहे. मला मोकळ्या हवेत राहण्यातच खरा आनंद वाटतो. आता मी कधी कधी त्या घराकडे जातो, दुरूनच माझ्या मित्रांना ते घर व तेथील लोकांबद्दल सांगतो. व मित्रांनो तुम्हाला ही मी सांगू इच्छितो ज्या पद्धतीने तुम्ही कुठेही जाण्यास स्वतंत्र आहात त्याच पद्धतीने मलाही स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला आवडते. म्हणून मला पिंजऱ्यात बंद न करता दुरूनच माझ्या सौंदर्याला अनुभव करा.
--समाप्त--