मला लॉटरी लागली तर | Mala lottery lagli tar nibandh in marathi
सुरुवातीच्या काळात लॉटरी तीन महिने, दोन महिने अथवा हप्त्यातून एकचदा निघायची. परंतु आता जसे सट्याचे नंबर रोज निघतात त्याच पद्धतीने लॉटरी देखील प्रत्येक दिवशी निघते. आजकाल लॉटरी च्या दुकानावर पाहिले तर तेथील गर्दी पाहून लक्षात येते की हा व्यवसाय किती वाढला आहे. अनेक लोक लवकर श्रीमंत होण्याच्या विचारात लॉटरी काढून आपली मेहनतीची कमाई वाया घालवतात.
मागील वर्षी एके दिवशी मी किराणा घ्यायला घराबाहेर पडलो होतो. तेव्हा रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभा राहिला सांगू लागला, "माझ्या घरी माझी मुले भुकेली आहेत, घरातील धान्य देखील संपले आहे. माझ्या कडील लॉटरी विकत घेणार तर माझ्या कुटुंबाला जेवणासाठी मी काहीतरी घेऊन जाईल." सुरुवातीला तर मी त्याला नाही म्हटलो परंतु त्याची परिस्थिती पाहून मला दया आली व मी एक लॉटरी तिकीट खरेदी केले. तिकीट घेऊन मी घरी आलो परंतु घरात कोणालाही न सांगता मी ते तिकीट कपाटीत ठेवले. माझे आई वडील लॉटरी ला जुव्या प्रमाणे समजत असत. म्हणून मी त्यांना काहीही सांगितले नाही.
काही दिवसांनी मी पुन्हा बाजारात गेलो. तेव्हा मला तो व्यक्ती पुन्हा दिसला. मला पाहताच तो माझ्या दिशेने पळत आला. त्याने मला सांगितले की माझे लॉटरी तिकीट वर 70 हजार रुपये लागले आहेत. हे ऐकुन माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी विचार केला की या पैश्यानी मी एक चांगली मोटरसायकल आणि मोबाइल फोन विकत घेईल. बाजारातून घरी जात असताना तर मी खूप आनंदी होतो. परंतु घरी पोहोचल्यावर ही गोष्ट आईला सांगण्याची हिम्मत माझ्यात नव्हती.
परंतु रात्री वडील घरी आल्यावर मी त्यांना सर्वकाही सांगितले. वडिलांनी माझ्यावर न रागावता मला समजून घेतले त्यांनी माझ्या आईला सांगितले की मी गरिबाला मदत म्हणून तिकीट घेतले. नंतर माझे वडील जाऊन लॉटरी चे पैसे घेऊन आले. मला मस्त बाईक घेऊन दिली. मी लॉटरी लागल्याबद्दल मित्रांना पार्टी देखील दिली.
काही दिवस झाले माझ्या डोक्यात विचार आला की का नाही पुन्हा एक तिकीट खरेदी करून पहावे. फक्त एकचदा जर लागले तर ठीक नाहीतर कधीही खरेदी करायचे नाही. असा विचार मी करीत होतो. काही दिवसांनीं मी वर्तमान पत्र वाचीत असताना एक बातमी वाचली. त्यात एक व्यक्ती लॉटरी च्या एवढ्या आहारी गेला होता की त्याने आपली सर्व मेहनतीची कमाई लॉटरी खरेदी करण्यावर वाया घालवून टाकली. आणि शेवटी फाशी लाऊन आत्महत्या केली. त्याचे सर्व कुटुंब अनाथ झाले.
ही बातमी वाचून मी दुःखी झालो. व मी निर्णय केला की मी आयुष्यात कधीही लॉटरी खरेदी करणार नाही. माझी स्वप्न पूर्णकरण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करील. यानंतर माझ्या मित्रांनाही मी ही बातमी दाखवली व आयुष्य कधीही लॉटरी खरेदी न करण्याची सल्ला दिलीं. आजकाल लॉटरी च्या खेळाने प्रभावित होऊन शाळा कॉलेज मधील विद्यार्थी घरातून पैसे चोरून लॉटरी खरेदी करतात. लॉटरी ही आपल्या देश आणि समाजासाठी खूप हानिकारक आहे. ज्या प्रमाणे जूआ आणि सट्याचा खेळ आहे अगदी त्याच पद्धतीने लॉटरी देखील आहे. फरक फक्त एवढाच आहे की सट्टा आणि जूआ चोरून खेळला जातो आणि लॉटरी ही सरकारमान्य पद्धतीने खेळली जाते. आज आवश्यकता आहे की शासनाने या दिशेने वाटचाल करीत लॉटरी व यासारखे अवैध खेळ लवकरात लवकर बंद करायला हवेत.
मित्रहो आशा करतो की mala lottery lagli tar हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल. ह्या निबंधला मित्रांसोबत शेयर करा. धन्यवाद.