माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh Marathi (200 शब्द)
शाळेला विद्यालय व इंग्रजीत स्कूल पण म्हटले जाते. शाळा असे स्थान आहे जेथे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाते. शाळा विद्यार्थ्याच्या भविष्याला उज्वल बनवते. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे व या शाळेत दूर दुरून मुले शिक्षण घ्यायायला येतात. मला माझी शाळा खूप आवडते.
माझ्या शाळेत एकूण 50 वर्ग आहेत आणि जवळपास 60 शिक्षके आहेत. 32 सहायक शिक्षक, एक प्राचार्य आणि 15 गेट कीपर आहेत. माझ्या शाळेतील मुख्यध्यापकाचा रूम विशेष पद्धतीने सजवलेला आहे. त्या रूममध्ये महात्मा गांधी सारख्या महान नेत्याचे फोटो लावलेले आहेत. या शिवाय कर्मचाऱ्यासाठी वेगळा रूम, ग्रंथालय, संगणक कक्ष आणि प्रयोग शाळा आहे.
माझ्या शाळेतील ग्रंथालयात नव्या व जुन्या पुस्तकाना संग्रहित केले आहे. या मध्ये साहित्य, पाककला, इतिहास, विज्ञान, भूगोल इत्यादि पुस्तके उपलब्ध आहेत. माझ्या शाळेचा वेळ सकाळी 7 वाजेपासून 1:30 पर्यन्त असतो. दुरून येणाऱ्या विद्यार्थी साठी स्कूल बस ची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी प्रार्थना सोबत शाळेची सुरुवात होते. माझी शाळा व शाळेतील सर्व शिक्षक शिस्तप्रिय आहेत, नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थीनां शिक्षा केली जाते.
कोणत्याही विद्यार्थी च्या जीवनात शिक्षक व शाळेचे महत्व अनन्यसाधारण असते. माझ्या शाळेचे शिक्षक धैर्य आणि प्रेमाने आम्हाला शिकवतात. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान आम्हाला शाळेमध्ये दिले जाते. इत्यादि अनेक कारणामुळे मला माझी शाळा खूप आवडते.