Advertisement

माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

माझी शाळा निबंध मराठी | Majhi Shala Nibandh Marathi

Majhi shala nibandh: मित्रहो आज आपण माझी शाळा निबंध मराठीतून  प्राप्त करणार आहोत. या निबंधात मी माझ्या शाळेचे वर्णन केले आहे. या निबंधाचा व्यवस्थित सराव करून तुम्ही तुमच्या शाळेबद्दल लिहू शकतात. 

माझी शाळा 10 ओळी निबंध | 10 lines on majhi shala 

  1. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा माध्यमिक विद्यालय आहे.

  2. माझी शाळा आमच्या शहरातील प्रसिद्ध शाळांमधून एक आहे.

  3. माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आणि भव्य आहे.

  4. माझ्या शाळेच्या समोर मोठेच मैदान आहे, या मैदानावर आम्ही विविध खेळ खेळतो.

  5. माझे शाळेत अनेक मित्र आहेत, ज्यांच्या सोबत मी अभ्यास व खेळ खेळतो. 

  6. माझ्या शाळेचे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी करतात आणि स्वभावाने ते खूप दयाळू देखील आहेत. 

  7. माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

  8. माझ्या शाळेत मोठेच ग्रंथालय आहे, जेथे अभ्यासाची व अभ्यासाव्यतिरिक्त इतर माहितीची पुस्तके मिळतात.

  9. माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. 

  10. घरापासून माझ्या शाळेचे अंतर एक किलोमीटर आहे.

  11. मला दररोज शाळेत जायला आवडते, कारण येथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.