Advertisement

माझा आवडता नेता (सुभाष चंद्र बोस) Maza Avadta Neta Subhash chandra bose marathi essay.

माझा आवडता नेता (सुभाष चंद्र बोस) Maza Avadta Neta Subhash chandra bose marathi essay.

तसे पाहता भारतीय स्वातंत्रयलढ्यात अनेक वीरांनी बलिदान दिले. पण माझे आवडते नेता नेताजी सुभाष चंद्र बोस हे आहेत. कारण नेताजींनी भारतीय स्वतंत्र लढ्यात इतर भारतीय नेत्यापेक्षा जास्त कठीण व महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेताजींच्या जन्म 23 जानेवारी 1887 ला ओडिसा राज्यातील कटक शहरामधील एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. 


नेताजींनी आपले शिक्षण कटक मधील रेवनशा काँलेजियेट स्कूल मधून पूर्ण केले. नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण साहित्य वाचून काढले. उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंड मधून पूर्ण केले. त्यांनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. त्यांनी जर ठरवले असते तर इंग्लंड मध्येच ते एशोआरमाचे जीवन जगू शकले असते पण आपल्या देशासाठी त्यांच्यात प्रचंड देशभक्ती ची भावना भरली होती, त्यांनी भारतात परत येऊन गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सक्रिय प्रवेश केला.


नेताजी काँग्रेस चे अध्यक्ष देखील बनून गेले. इंग्रज शासनाविरुद्ध त्याच्या उग्र विचारांना पाहून इंग्रजांनी त्यांना नजर कैद केले. आपले रूप बदलवून ते भारतातून जर्मनी पोहोचले. जर्मनीत हिटलर शी त्याची भेट झाली. हिटलर कडून त्यांना मदतीचे आश्वासन पण मिळाले. 1943 साली ते जर्मनी हून जपान पोहोचले. सशस्त्र क्रांती द्वारे भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी "आझाद हिंद फौज" ची स्थापना केली. दुसऱ्या महायुध्दात आझाद हिंद फौज च्या सैनिकांनी आपले शौर्य दाखवले. पण जपान द्वारे समर्पण केल्याने सर्व सैनिकांना इंग्रजांनी अटक केली. 


सुभाष चंद्र बोस यांनी देशवासीयांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा". 18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान हवाई दुर्घटना दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला. परंतु त्याचे मृत शरीर अजुनही मिळालेले नाही. भारताच्या स्वतंत्र लढ्यात आपली अती महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या महान क्रांतिकारीला माझे प्रणाम.