Advertisement

माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi

माझी सहल [आमची सहल] मराठी निबंध । Mazi Sahal Essay in Marathi

माझी सहल मराठी निबंध | majhi Sahal Nibandh (300 शब्द)

मागच्या वर्षी उन्हाळी परीक्षा एप्रिल महिन्यात संपल्या व जून पर्यंत सुट्ट्या होत्या. या दरम्यान आमच्या मुख्यद्यापकानी ठरवलेले होते की कोणत्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी सहलीला न्यायचे आहे. आमच्या वर्गाचा पण दिवस ठरला होता. सहल ही आमच्या शाळेपासून 5 किलोमीटर दूर असलेल्या नदी जवळ होती. तसे पाहता ही शैक्षणिक सहल नव्हती, मनोरंजनासाठी या सहलीला आयोजित केले होते.


शाळेपासून नदी जवळ असल्याने आम्ही ठरवले होते की ज्या विद्यार्थ्यांकडे सायकल आहे त्यांनी सायकलने नदीवर पोहोचावे. व ज्याच्या कडे सायकल नव्हती त्याच्यासाठी घोडागाडी ची व्यवस्था केली होती. वर्गातील एकूण 25 विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झाली. 15 विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या सायकली होत्या, म्हणून फक्त 10 च विद्यार्थी घोडागाडीत आले. हसत हसत, गप्पागोष्टी करत आम्ही 9 वाजेपर्यंत नदीवर पोहोचलो. 


उन्हाळा असल्याने सुर्य सुद्धा गरम होऊ लागला होता. घामामुळे शरीर ओलेचिंब झाले होते. म्हणून आम्ही ही थकावट काढण्यासाठी नदीत स्नान करण्याचे ठरवले. नदीत एक तास आम्ही अंघोळ आणि मस्ती केली. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी पण सोबत आले होते. ते स्वयंपाकाच्या तयारीत लागून गेले. नदीत अंघोळ केल्यानंतर आम्ही टीम पाडल्या आणि सर्वजण वेगवेगळे खेळ खेळू लागलो.


दुपारी एक वाजेला स्वयंपाक तयार झाला. शिक्षकांनी आम्हाला स्वयंपाक तयार झाल्याची सूचना दिली. आम्हाला भूक पण खूप लागली होती. सर्व मुले जेवणावर तुटून पडले, सर्वांनी पोटभर जेवण केले. 2 वाजेपर्यंत सर्वांचे जेवण पूर्ण झाले. यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. गाणे म्हणणे, जोक्स आणि गोष्टी सांगणे सुरू झाले. आमच्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. 


संध्याकाळी 4 वाजेला आमच्यात क्रिकेट चा सामना झाला. साडे पाच वाजले होते सरांनी सर्वांना परत निघायला सांगितले. आपापली बॅग भरून आम्ही सर्वजण घराकडे निघालो. संपूर्ण दिवस आम्ही खूप मजा केली म्हणून ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सहल होती.

--समाप्त--