मी मुख्याध्यापक झालो तर निबंध | Mi mukhyadhyapak zalo tar marathi nibandh
प्रत्येक विद्यार्थ्याची काही न काही स्वप्न असते. माझी इच्छा शाळेचा मुख्याध्यापक होण्याची आहे. कारण मुख्याध्यापक असा व्यक्ती असतो ज्याच्या हातात संपूर्ण शाळा असते. म्हणूनच मुख्याध्यापक बनण्यासाठी ची आवश्यक तयारी मी आजपासूनच सुरू केली आहे. पुढील शिक्षणात मी बी.ए., एम.ए. आणि एम.एड. करेल. आणि येवढे शिक्षण केल्यावर मी मुख्याध्यापक झालो तर माझ्या शाळेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेईल.
मला माहित आहे की एका शाळेच्या मुख्यद्यापकाचे पद खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही शाळेची प्रगती मुख्याध्यापकावरच अवलंबून असते. मुख्याध्यापक हा शाळेचा मुख्य बिंदू असतो. व त्यांच्या आजुबाजूलाच शाळेतील सर्व गोष्टी केंद्रीभूत असतात. मुख्याध्यापकाच्या रूपात माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील. माझे मानणे आहे की कोणताही विद्यार्थी शिस्तीशिवाय आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बनवून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.
परंतु शिस्तीचे नियम फक्त विद्यार्थ्यांवरच लागू होत नाहीत. मुलांमध्येही शिस्त शिक्षक व मुख्यद्यापकांना पाहूनच येते. म्हणून सर्वात आधी मी स्वतः सह शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला शिस्तीचे धडे दिले असते. महात्मा गांधींचे म्हणणे होते की "आपण समाजाला तोपर्यंत शिस्तीचे धडे देऊ शकत नाही, जोपर्यंत आपण स्वतः शिस्तीचे पालन करीत नाही. " गांधीजींच्या याच कथनानुसार मी सर्वात आधी स्वतःमध्ये शिस्त आणली असते. यानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांना शिस्तीत राहण्यासाठी सांगितले असते.
मुख्याध्यापक झाल्यावर माझे दुसरे कार्य विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे राहील. त्यांच्यात नैतिक मूल्यांना वाढवून उत्तम चरित्र व व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मी प्रयत्न केले असते. आपल्या देशात आज चारही बाजूंना नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. चोरी, असंतोष, व्याभिचार, धार्मिक दंगे, लूटपाट इत्यादी घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना कमी करण्यासाठी आवश्यक आहे कि विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण द्यायला हवे.
शिस्त व नैतिक शिक्षण लागू केल्यानंतर माझे तिसरे कार्य, फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्तीतजास्त भर देणे राहील. आजकाल आपल्या देशात बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागील मुख्य कारण शाळां व कॉलेज मध्ये होत असलेल्या प्रात्यक्षिक शिक्षणाकडील दुर्लक्ष आहे. मी मुख्यद्यापक झाल्यावर शाळेत नवनवीन आधुनिक मशीन आणून विद्यार्थ्यांना त्यांची कार्य प्रणाली समजाविल.
आजचे युग संगणकाचे युग आहे. दिवसेंदिवस संगणकाचा वापर वाढत आहे. म्हणूनच मुख्याध्यापक झाल्यावर माझे कार्य विद्यालयात संगणक शिक्षणावर भर देणे राहील. फक्त माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांनाच संगणक न शिकवता प्राथमिक इयत्तेपासून संगणक प्रशिक्षण अनिवार्य करेल.
मुख्याध्यापक झाल्यावर व्यायाम व खेळांकडे माझे विशेष लक्ष राहील. आजच्या काळात व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे कारण व्यायामामुळेच व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. म्हणूनच माझा शाळेच्या आभ्यासा शिवाय खेळणे व व्यायाम करण्यावर विशेष भर राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी प्रोत्साहित करेल.
अशा पद्धतीने मुख्याध्यापकाच्या रूपात मी पूर्ण निष्ठेने माझे कार्य पार पाडेल. माझ्या शाळेत अशी शिक्षण पद्धती निर्माण करेल जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षणासोबत देशाविषयी प्रेम आणि आपल्या संस्कृती विषयी आदर निर्माण होईल.
***