माझे आवडते शास्त्रज्ञ न्यूटन | My Favourite scientist essay in Marathi
मी भरपूर शास्त्रज्ञांबद्दल माहिती मिळवली आहे. तसे पाहता मानवजातीसाठी या सर्वच शास्त्रज्ञांची कामगिरी प्रशंसनीय आहे. परंतु मला आवडलेले शास्त्रज्ञ न्यूटन आहेत. व ते माझे आवडते शास्त्रज्ञ देखील आहेत. न्यूटन यांनी 3 क्रांतिकारी शोध लावले. ज्यात प्रकाशाचे नियम, द्रव्य स्थिती आणि गुरुत्वाकर्षणाचे नियम समाविष्ट आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार विश्वातील सर्वच नैसर्गिक वस्तू या गतिमान असतात. सूर्य, चंद्र, नक्षत्र, ग्रह, तारे इत्यादी सर्व गोष्टीना गुरुत्वाकर्षणामुळे गती प्राप्त होते.
न्यूटन यांचा जन्म इंग्लंड मधील लिंकनशायर शहराजवळील वुलस्टोर्प मध्ये झाला. न्यूटन ची जन्म तिथी 25 डिसेंबर 1642 सांगितली जाते. न्यूटन चे वडील एक सामान्य शेतकरी होते. न्यूटन चा जन्माच्या तीन महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. न्यूटन 3 वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले व न्यूटन ला त्याच्या आजीकडे सोडून दिले. परंतु न्यूटन जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची आई आपल्या दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा न्यूटन जवळ येऊन गेली.
न्यूटन यांनी आपले शिक्षण लिंकनशायर शहराच्या एका शाळेत केले. त्यांना रसायन विज्ञान विषयात आवड होती. मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रेवेश घेतला. 1665 मध्ये त्यांना बी ए ची पदवी प्राप्त झाली. 1666 मध्ये त्यांनी बिनोमिअल प्रमेय चा शोध लावला. परंतु याच दरम्यान प्लेग ची साथ आली ज्यामुळे त्यांना आपले कॉलेज सोडून घरी यावे लागले.
एके दिवशी आपल्या बागेत बसून ते काहीतरी विचार करीत होते इतक्यात झाडावरून एक फळ खाली पडले. त्या फळाला हातात धरून ते विचार करू लागले की हे फळ खालीच का पडले? वर आकाशात का नाही गेले? त्यांनी ही गोष्ट अनेक लोकांना सांगितली ते सांगू लागले की पृथ्वीवर कोणतीतरी शक्ती कार्यरत आहे जी या फळाला खाली खेचत आहे. परंतु कोणीही त्यांच्या या गोष्टीला गंभीरपणे घेतले नाही. दीर्घ काळापर्यंत विचार करीत शेवटी न्यूटन ने सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रतिपादित केला. त्यांनी सांगितले की समुद्रात येणाऱ्या लहरी, सूर्य, चंद्र, पृथ्वी व ग्रह हे सर्व एका शक्तीच्या सहाय्याने कार्य करतात. त्यांनी या शक्ति ला गुरुत्वाकर्षण शक्ती असे नाव दिले.
यानंतर अनेक वर्षे अभ्यास करून 1684 मध्ये त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांचे पुरावे उपलब्ध करून दिले. सन 1705 मध्ये त्यांना सर ही उपाधी देण्यात आली. त्यांनी आपले पुस्तक फिलॉसॉफी नेचुरल प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक लिहिले. या पुस्तकामुळे त्यांचा सन्मान अधिकच वाढला. त्यांचे हे पुस्तक अनेक भाषांमध्ये छापले गेले. सन 1727 मध्ये न्यूटन आजारी पडले व 20 मार्च 1727 त्यांचा मृत्यू झाला. सर आयझॅक न्यूटन त्यांचे प्रकाश संबंधित नियम, गुरूत्वाकर्षण व गणिती शोधांमुळे जगभरात ओळखले जातात. आपल्या आयुष्यातील संपूर्ण वेळ या शोधासाठी देणारे महान शास्त्रज्ञ न्यूटन यांना जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये स्थान दिले जाते.
--समाप्त--