Advertisement

[निबंध] माझे आजोबा निबंध मराठी | My Grandfather Essay In Marathi

[निबंध] माझे आजोबा निबंध मराठी | My Grandfather Essay In Marathi

नमस्ते मित्रहो कसे आहात तुम्ही. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी माझे आजोबा या विषयावर निबंध घेऊन आलो आहोत. आजच्या या मराठी निबंधात दिलेली माहिती शाळा कॉलेज आणि परीक्षांमध्ये खूप उपयुक्त ठरेल. तर चला सुरू करुया आजच्या या maze ajoba मराठी निबंधाला. 


माझे आजोबा मराठी निबंध- maze ajoba marathi nibandh

प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही लोक असतात. ज्यांना पाहून आपण प्रभावित होतो. जे आपल्याला खूप प्रेम करतात. माझ्या आयुष्यातील असे एक व्यक्ती होते आणि ते म्हणजे माझे आजोबा. माझे आजोबा जरी आज आमच्या सोबत नाही आहेत तरी त्यांच्या आठवणी माझ्या मनात नेहमी ताज्या राहतील. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आईवडिलांकडे कमी तर माझ्या आजी आजीबांकडेच जास्त राहायचो. मला माझे आजोबा खूप आवडायचे कारण ते कोणतीही गोष्ट असो मला नको म्हणायचे नाही. 


जर मला बाहेरचे काही खायचे असेल तर ते माझे बोट धरून मला जवळच्या दुकानावर न्यायचे आणि मला माझी आवडती वस्तू घेऊन द्यायचे. माझे आजोबा मला कधीच विनाकारण रागवायचे नाहीत. जर पप्पा मला कधी काही बोलायला लागले तर ते पप्पांवर रागवायचे त्यांना सांगायचे की मुलगा लहान आहे त्याला प्रेमाने समजावं. मी देखील माझ्या आजोबांची प्रत्येक गोष्ट ऐकायचो. 


माझ्या आजोबांचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झाले होते. परंतु त्यांनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचे नाश्ता हॉटेल टाकले होते. नंतरच्या काळात आजोबांचे वय झाल्याने हॉटेल विकून टाकले. माझे आजोबा धार्मिक स्वभावाचे होते त्यांनी मला व माझ्या आधी माझ्या वडिलांना चांगले संस्कार दिले होते. लहान असताना ते मला दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात न्यायचे. मंदिरात दर्शन घेऊन ते मला बागेत खेळायला घेऊन जात असत. 


संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही सोबत जेवण करायचो मी नेहमी माझ्या आजोबांसोबत झोपायचो. आजोबांना थोडे फार संगणक चालवता यायचे. परंतु मी त्यांना पूर्ण संगणक चालवणे शिकवले. आजोबा मला त्यांच्या काळातील अनुभव सांगत असत. अनेक जुन्या बोधकथा त्यांनी मला सांगितल्या आहेत. दररोज रात्री झोपण्याआधी ते माझा अभ्यास घेत असत. मला अभ्यासात असणाऱ्या समस्या ते सोडवून देत असत. 


माझे आजोबा खूप प्रेमळ स्वभावाचे ते इमानदार व सर्वांचा आदर करणारे होते. मोठ्यांचा आदर, मेहनत व इमानदारीची शिकवण त्यांनीच मला दिली. खरोखर माझे आजोबा खूप चांगले होते. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते.

--समाप्त--