Advertisement

ऑनलाइन शिक्षण: निबंध मराठी फायदे व तोटे | online education essay in marathi

ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे - Online Education Essay in Marathi : आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे. 


नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. 


परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. यातच भर म्हणजे मागील वर्षी आलेली जागतिक महामारी covid 19 होय. या एक वर्षात देशातील ऑनलाईन शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढले. आज आपण ऑनलाइन शिक्षण या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया...

ऑनलाइन शिक्षण निबंध मराठी | online education essay in marathi

आज शिक्षण हे आपल्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तायुक्त शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण चांगला शिक्षणाच्या बळावरच योग्य करिअर निवडले जाऊ शकते. कोणत्याही देशाला विकसित करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. 


आपल्या देशात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. देशातील परंपरागत शिक्षणाने आधुनिक रूप घेतले. वर्तमान काळात ई एज्युकेशन अर्थात ऑनलाइन शिक्षण भारतासह जगभरात लोकप्रिय झाले आहे. ऑनलाइन शिक्षण एक अशी शिक्षण प्रणाली आहे ज्यात शिक्षक इंटरनेट चा वापर करून देशातील किंवा जगभरातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. 


ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ?

आज जगभरात पसरलेली महामारी कोविड 19 मुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यू मुळे घरातून बाहेर निघून शिक्षण प्राप्त करणे कठीण झाले आहे. अशा काळात देशातील विविध शाळांमधील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. स्काईप, व्हाट्सअप, झूम व्हिडीओ इत्यादी काही प्रसिद्ध मोबाईल ॲप आहेत ज्यांच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण दिले जाते. यात विद्यार्थी आपापल्या घरी बेडरूम किंवा स्टडी टेबल वर बसून लॅपटॉप अथवा मोबाईल च्या सहाय्याने शिक्षण मिळवू शकतात. 


ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे निबंध मराठी

ऑनलाइन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थी जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात घरबसल्या शिक्षण प्राप्त करू शकतो, परंतु आजही आपल्या देशात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही तर हा ऑनलाइन शिक्षणाचा तोटा आहे.

पुढे आपणास ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे दोन्ही देण्यात आले आहेत.  


ऑनलाइन शिक्षणाचे फायदे

ऑनलाइन शिक्षणाला आधुनिक शिक्षणाचे नवीन स्वरूप म्हटले जाऊ शकते. ज्यात विद्यार्थ्यांना लांब प्रवास करून शाळेत फळ्यासमोर बसण्याऐवजी घरबसल्या लॅपटॉप वरूनच शिक्षकांशी संपर्क करता येतो. या शिक्षणासाठी आवश्यकता एवढीच आहे की विद्यार्थ्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाईल / कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असायला हवे.  

आज शाळा, कॉलेज तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी कोचिंग साठी घराबाहेर न जाता, घरीच राहून निश्चिंतपणे शिक्षण घेत आहेत. या शिक्षणामुळे दूर शाळा असणाऱ्या विद्यार्थ्याला लागणारा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. विदेशात शिक्षणाची ईच्छा असूनही आर्थिक परिस्थिती ठीक नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा फायदा झाला आहे. ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या वेळेनुसार योग्य वेळ निवडून लेक्चर करू शकतो. 


ऑनलाइन शिक्षणाचे तोटे

ऑनलाईन शिक्षणात वेळ आणि पैसा दोघींची बचत होते. परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. ऑनलाइन शिक्षणाचे देखील तसेच आहे. जसे एकीकडे याचे फायदे आहेत त्याच पद्धतीने अनेक नुकसान व दुष्परिणाम देखील आहेत. आपल्या देशात अजूनही अनेक खेड्या गावात इंटरनेट उपलब्ध नाही आहे व ज्या लहान शहरांमध्ये इंटरनेट आहे तेथे त्याची गुणवत्ता फार चांगली नाही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य नेटवर्क ची आवश्यकता असते. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने व्हिडिओ थांबणे, आवज ऐकू न येणे किंवा व्हिडिओ अडकणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. 


ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. आधी शाळेत गेल्यावर शिक्षेचे भयाने विद्यार्थी लक्ष देऊन शिक्षकांचे शिकवणे ऐकत असे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात आणि कित्येकदा ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत. 


व्यवहारीक अनुभव आणि प्रात्यक्षिके ही शिक्षणाच्या दृष्टिने खूप महत्त्वाची आहेत. ऑनलाईन शिक्षणात जास्तकरून प्रात्यक्षिकांचा आभाव दिसून येतो. या शिक्षणात ॲनिमेटेड व्हिडिओ चा उपयोग केला जातो. शाळेत विद्यार्थी भौतिक वस्तूंचे निरीक्षण करून अभ्यास करतात. हा प्रात्यक्षिक स्पर्श त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करतो. परंतु ऑनलाईन शिक्षणात याची कमी असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होत नाही. या शिवाय तासन्तास मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास निर्माण व्ह्यायला लागतात. डोके दुखी, डोळ्यात आग होणे व थकवा येणे यासारख्या शारीरिक समस्या तर चिडचिडेपणा या सारख्या मानसिक समस्या निर्माण होतात. 


ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य - Online Shikshan Marathi Nibandh

ऑनलाइन शिक्षणाचे अनेक फायदे आहेत परंतु त्या सोबत दुष्परिणाम देखील आहेत. परंतु असे म्हणणे देखील चुकीचे नाही की लॉक डाऊन च्या काळात याच पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत झाली. आज ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या शिवाय दूर राहणाऱ्या तसेच वयस्क विद्यार्थी जे स्वशिस्त आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षण पद्धत योग्य आहे. परंतु बाल व किशोरवयीन मुलांसाठी पारंपारिक पद्धतीने शाळेत जाऊन शिक्षण घेणे जास्त योग्य आहे. शिक्षणाच्या या दोन्ही पद्धती वापरून विद्यार्थी आपल्या ज्ञानात वृध्दी करून आयुष्यात यश मिळवू शकतो.