Advertisement

पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा निबंध | save water project information in marathi

Save water essay in marathi: पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही नाही मग ते जीवन प्राण्यांचे असो वा मनुष्याचे. परंतु आजच्या आधुनिक युगात माणसाच्या निष्काळजीपणामुळे  धरतीवर पाण्याची कमी सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा परिणामस्वरूप आज खूप सारे ठिकाण पाण्याच्या आभावाने कोरडे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोक स्वच्छ पाण्यासाठी तळमळ करीत आहेत. 


पाणी वाचवण्याची आवश्यकता pani vachava in marathi

मनुष्य हा अन्ना शिवाय 3 आठवडे जगू शकतो पण पाण्या शिवाय 2-3 दिवसच जिवंत राहू शकतो. पृथ्वीच्या अर्ध्या पेक्षा जास्त भागावर पाणी आहे, परंतु यातील अधिक पाणी के खारे आहे म्हणूनच पिण्यायोग्य पाण्याची फारच टंचाई आहे. मनुष्य आपले नियमित कार्य जसे अंघोळ करणे, कपडे वैगरे धुणे, अन्न शिजवणे इत्यादी कार्यांमध्ये सर्वात जास्त पाणी वाया घालवतो. एका अनुमानानुसर 2025 पर्यंत पाण्याच्या कमी मुळे जवळपास 3 अरब लोक पीडित असतील. म्हणून जर आपण आज पासूनच पाणी वाचवण्यासाठी उपाय करू तर भविष्यात या समस्यावर मात करता येईल.


जल संरक्षणाचा अर्थ-

जल संरक्षणाचा साधारण अर्थ आहे की कोणत्याही पद्धतीने पाणी वाचवणे. तुम्ही स्वतःच विचार करा आज पृथ्वीवर फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे आणि या पेक्षा चिंताजनक गोष्ट कोणतीच राहू शकत नाही. विशेषज्ञच्या अनुसार जर जल संरक्षणाचे उपाय नाही केले गेले, व अश्याच पद्धतीने पाण्याची बरबादी सुरू राहिली तर तीसरे महायुद्ध पाण्यावर अधिकार मिळवण्यासाठी होईल, आणि यात मानव जातीचा विनाश निश्चित आहे.

जल संरक्षणाचे उपाय/ पाणी बचत उपाय-

जर भविष्यात होणाऱ्या जल संकटांपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम सर्व लोकामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. आज मानवाने आपल्या चुकांमुळे निसर्गाला खूप क्षति पोहचवली आहे, म्हणून जर येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व वाचवायचे असेल तर पुढील उपाय करणे आवश्यक आहे.

1) शौच तसेच धुणी भांडी साठी खारे तसेच पावसाचे पाणी सुद्धा वापरता येऊ शकते.


2) झाडांना पाणी देण्यासाठी नळी ऐवजी बादली व मग वापरा.


3) जर घरात नळ वैगरे टपकत असेल तर त्याला लवकरात लवकर दुरुस्त करा कारण टपकणार्या नळातून खूप सारे पाणी वाया चालले जाते.

4) पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याला जमा करण्यासाठी छतावर टाकी व इतर पाणी भरण्याची भांडी ठेवा.


5) रोजचे काम जसे भांडे धुणे, कपडे धुणे, जेवण बनवणे इत्यादी कामात कमीत कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करा.


6)अंघोळीला शॉवर ऐवजी बादली मधील पाणी वापरा.


७) घराच्या अंगणाला परत परत पाण्याने धुण्याऐवजी झाडू चा वापर करा.


पाणी वाचवा घोषवाक्य मराठी (save water slogans in marathi)

1) पाणी वाचवा, जीवन वाचवा.


2) जनहितार्थ सूचना जारी, जल संरक्षणाची करा तयारी.


3) प्रत्येकाने आहे ठरवले, पाणी आता आहे वाचवणे.


4) जल संरक्षणाची करा तयारी, होणार आहे वर्षा भारी.


5) पाणी वाचवू सर्वांना पाण्याचे महत्त्व समजावू.


6) पाण्याला नका करू बेकार, नाहीतर येत्या दिवसात माचेल हाहाकार.


7) पाणी सर्वांची तहान भागवते, पाण्याने शेतकऱ्याचे पीक उगवते.


8) पाण्याचा नेहमी ठेवा मान, तेव्हाच देश बनेल महान.


पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध- Pani adva pani jirva marathi nibandh (Save Water Essay in Marathi)


आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा एक एक थेंब अमृताप्रमाने आहे. परंतु आज मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट केले जात आहे, ज्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. जर पाण्याचा हा अपव्यय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर येणाऱ्या काळात पिढीला पाण्याच्या एक एक थेंबाकरीता तळमळ करावी लागेल. 


पाण्याचा अभावाने भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर पाण्याचा अपव्यय थांबवावा लागेल. आज आपल्या देशात अनेक ठिकाणी बुच नसलेले नळ आहेत. या नळांमधून नेहमी पाणी वाहत राहते. काही ठिकाणी गरज नसतांना स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. आज पृथ्वीवरील जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. परंतु यातील फक्त थोडेच पाणी पिण्यायोग्य आहे. उरलेले सर्व पाणी समुद्राचे खारे आणि दूषित पाणी आहे. 


पाण्याचे आभावाने व दूषित पाणी प्यायल्याने दरवर्षी जगभरात 40 लाख लोक मृत्यू मुखी पडतात. स्वच्छता नसलेल्या दूषित पाण्याला प्यायल्याने अनेक रोग पसरतात. भारतासारख्या विकसनशील देशात या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे. पाण्याने होणाऱ्या रोगांमुळे जगभरात दर 15 सेकंदात एका बालकाचा मृत्यू होतो. शुद्ध पाणी मिळावे म्हणून दरवर्षी जगभरात 80 अरब डॉलर खर्च केले जातात. 


जीवनशैलीत फार जास्त बद्दल न करता आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. दररोज एका घरातील प्रत्येक सदस्य दिवसातून सरासरी 260 लिटर पाणी वापरतो. प्रत्येक व्यक्तीला आपली जवाबदारी समजायला हवी. अन्न धुणे तसेच शिजवणे या कामांमध्ये जास्त पाणी वापरू नये. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी शौचालय, कपडे धुणे, झाडांना देणे इत्यादी कामांसाठी वापरावे. पावसाचे पाणी आपण एकत्रित करून वापरायला हवे. 


अंघोळ करताना शॉवर वापरण्याऐवजी बादली मधील पाण्याने अंघोळ करावी. होळी सारख्या सणांच्या वेळी जास्त पाणी सांडू नये. काम झाल्यावर लगेच नळ बंद करावा. जर घरातील नळ खराब झाला असेल व त्यातून पाणी टपकत असेल तर त्याला लगेजच बदलावावे, कारण थोडे थोडे पाणी टपकणाऱ्या नळाने देखील पाण्याचा खूप अपव्यय होतो.


पृथ्वीवर जीवनाचा सर्वात आवश्यक स्त्रोत पाणी आहे. जल हेच जीवन आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून आपल्याला नष्ट होणारे पाणी रोखायला हवे. व जास्तीत जास्त पाणी अडवायला हवे आणि जास्तीत जास्त पाणी जिरवायला हवे.